Chrysopelea ornata, Image credit: https://commons.wikimedia.org/wiki/File:Chrysopelea_ornata.jpg
साप! साप! म्हटलं की सर्वांना भीती वाटायला लागते. कारण सर्वांना असं वाटतं की हा साप नक्कीच विषारी असणार आणि साप चावला तर इजा होईल. म्हणून बहुतेक सर्व लोक सापापासून चार हात लांब राहण्यास प्राधान्य देतात. सापांना सरपटणारा प्राणी म्हटलं जातं, म्हणजेच ते जमिनीवर किंवा झाडांवर सरकतात. तुम्ही “फ्लाइंग सिख” ऐकलं असेल, पण कधी “फ्लाइंग स्नेक (उडनारा साप)” पाहिला आहे का? तुम्हाला माहित आहे का की अशी काही साप आहेत, जी हवेत उडू शकतात? तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे! असंही काही साप आहेत, जे ३ ते ४ फूट उंचीवर उडू शकतात.
हो, मित्रांनो! उडनारा सोनसर्प म्हणजेच “ऑरनेट फ्लाइंग स्नेक” (शास्त्रीय नाव: Chrysopelea ornata / क्रिसोपेलिया ओर्नाटा) असं ओळखले जातं. हे साप दक्षिण आणि आग्नेय आशियात आढळतात. सहसा हे साप झाडांवर राहतात आणि फांद्यांवरून उडताना आपल्याला असं वाटतं की ते हवेत उडत आहेत. त्याची त्वचा सूर्यप्रकाशात सोन्यासारखी चमकते, म्हणून त्याला “उडनारा सोनसर्प” असं म्हणतात. भारतात, खासकरून महाराष्ट्रातील चंद्रपूर, गडचिरोली आणि आंबोली घाटात हा साप आढळतो. याचं आणखी एक प्रकार म्हणजे पॅरेडाइज फ्लाइंग स्नेक, जो अंदमानच्या नारकोश डॅममध्ये दिसतो.
उडनारा साप हा लहान किंवा मध्यम आकाराचा असतो. त्याचं शरीर काठीसारखं गोल, सडपातळ आणि पाठीवर गुळगुळीत खवले असतात. त्याच्या पाठीवर काळे, पिवळे आणि तांबड्या रंगाच्या नक्षी असतात, तर त्याचा खालचा भाग हिरवट असतो. झाडावर चढण्यासाठी त्याच्या पोटाच्या खवल्यांचा उपयोग होतो. या सापाच्या डोक्यावर आणि अंगावर चकचकीत पट्टे असतात. या सापाच्या नक्षीमध्ये अधिवासानुसार वेगवेगळी फरक असू शकतात.
उडणारा साप विशेष तंत्राने हवेतील उड्या मारतो. त्याच्या शरीरावर एक प्रकारचे असंख्य खवले असतात, ज्यामुळे तो झाडावर चढू शकतो. आणि त्याचा आकार लहान असल्यामुळे तो जास्त लांब उडी मारू शकतो. शास्त्रज्ञ या प्रक्रियेला ‘ग्लायडिंग’ असे संबोधतात. तो इतर सापांच्या तुलनेत हवेत अधिक वेळ उभा राहतो आणि सहज उड्डाण करतो.
हे साप तीन ते चार फूट उंच उडी मारू शकतात. आकाराने छोटे साप जास्त उंचीवर उडू शकतात. उड्डाण करताना ते “s” अक्षराच्या आकारात फिरतात. असं उडणं म्हणजेच एक प्रकारचं सापांचं आश्चर्यकारक संतुलन राखून करायला सक्षम असणं.
असा साप आढळल्यास, तुम्ही त्याला त्रास देऊ नका आणि स्थानिक सर्पमित्राच्या मदतीसाठी संपर्क साधा. त्याला सुरक्षितपणे जंगलात सोडण्याचा प्रयत्न करा. सर्पमित्रांचा आणि सापांची पाळकशी घेणाऱ्यांची मदत ही या सापांच्या जीवनासाठी महत्त्वाची ठरते. तसेच, सापांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी त्यांची नोंद करा आणि अभ्यास करा.
सर्प मित्रांच्या आणि सापांच्या अभ्यासकांच्या मदतीने आपण उडणारा साप आणि अन्य सापांच्या संरक्षणासाठी कार्य करू शकतो. या सापांचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून ते पुढे येणाऱ्या पिढ्यांपर्यंत सुरक्षित राहू शकतील.
उडणारा सोनसर्प हा एक अद्भुत साप आहे, जो आपल्या अनोख्या क्षमतेमुळे सापांच्या जगात एक विशेष स्थान घेतो. त्याचे आकर्षक रंग, त्याची उड्डाणाची क्षमता आणि सापांचा अद्भुत जग ह्यामुळे तो सर्प मित्रांसाठी एक आव्हान म्हणून उभा राहतो. त्याचे संरक्षण आणि संवर्धन हे आपलं कर्तव्य आहे. चला तर, या अद्भुत सापांची सुरक्षा आणि संवर्धन यासाठी आपले योगदान देऊया.
तर मग मित्रानो कधी फिरायला निघालात आणि आढळला हा उडणारा सोनसर्प तर घाबरून न जाता वरील बाबी लक्षात ठेवूयात आणि या सापांच्या रक्षणासाठी आपले योगदान देऊया.
आशा आहे की तुम्हाला हे साप आणि त्याच्या उडण्याच्या कलेबद्दल काही नवे शिकायला मिळालं असेल.
उन्हाळा आला की सगळी जनता थेट "कलिंगड मोड" मध्ये शिफ्ट होते! एसीपेक्षा जास्त विश्वास कलिंगडावर ठेवणारे आपण, थोडी जरी गरमी… Read More
भारतामध्ये क्रिकेट केवळ एक खेळ नाही तर एक भावना आहे. शहरांपासून ते खेड्यापर्यंत, प्रत्येक ठिकाणी क्रिकेटचा प्रभाव जाणवतो. मात्र, क्रिकेटसाठी… Read More
पूर्वी प्रवास करताना टोल नाक्यावर रोख पैसे देऊन रांगेत थांबणं ही एक सवयच होती. २०१४ नंतर FASTag प्रणाली आली आणि… Read More
This website uses cookies.