मुलं हि देवाघरची फुल असतात. अतिशय निरागस आणि गोंडस! पृथ्वीतलावर देखील असे अनेक सुंदर प्राणी, पशु-पक्षी यांच्या प्रजाती आहेत. पण त्यापैकीच एक तिशय वेगळी आणि सुंदर प्रजाती मुलांनो तुम्हाला माहिती आहे का? या पृथ्वीतलावर आणि विशेषतः भारतात तुमच्यासारखीच अगदी गोंडस दिसणारी एक प्रजाती आहे! कोणती आहे बरं ती प्रजाती?
ही प्रजाती म्हणजेच डॉल्फिन्स! होय, डॉल्फिन हे एक प्रकारचे मासे आहेत. डॉल्फिन हे पृथ्वीवरील सर्वात गोंडस प्राण्यांपैकी एक आहेत. ते खेळकर आणि बुद्धिमान आहेत आणि बहुतेकदा समुद्री अधिवासात आढळतात. हे डॉल्फिन नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे या डॉल्फिनांसाठी भारतातील बिहारमध्ये विक्रमशीला मरीन पार्क नावाचा प्रदेश राखीव ठेवला गेला आहे.
इ.स. १९९८ पर्यंत ही एक प्राण्यांची वेगळी जात म्हणून ओळखली जात होती. पण १९९८ मध्ये हे डॉल्फिन आहेत असे जाहीर झाले. हा प्राणी भारताने राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित केला आहे.
गंगा नदी डॉल्फिन्स (प्लॅटनिस्टा गंगेटिका)
भारतात गंगा नदी, सिंधु (इंडस) नदी आणि चंबळ नदीमध्ये देखील डॉल्फिन आढळतात. यापैकी गंगा नदी डॉल्फिन्स (प्लॅटनिस्टा गंगेटिका) किंवा गंगेज रिव्हर डॉल्फिन ही गोड्या पाण्यात आढळणारी एक प्रजाती आहे, आणि या डॉल्फिन्स दक्षिण आशियातील गंगा, ब्रह्मपुत्र आणि सिंधू या नद्यांमध्ये आढळतात. यांना ‘सुसू’ किंवा ‘हिहू’ या नावानेही ओळखले जाते.
गंगा नदीतील डॉल्फिनला दृष्टी नसते, ते इकोलोकेशन (echolocation) चा वापर करतात, म्हणजे ते अल्ट्रासोनिक ध्वनी उत्सर्जित करून शिकार करतात. भारतीय पौराणिक कथांमध्ये, डॉल्फिनला गंगा देवीचे वाहन मानले जाते.
सिंधु नदी डॉल्फिन्स: पंजाबमधील बियास नदीत सिंधु (इंडस) नदी डॉल्फिन्स आढळतात. सिंधू नदीतील डॉल्फिनला ब्लाइंड रिव्हर डॉल्फिन किंवा भुलान असेही म्हणतात.
चंबळ नदी डॉल्फिन्स: हे चंबळ नदीत आढळतात. डॉल्फिन्स हे सस्तन प्राणी असल्याने पाण्यात श्वास घेऊ शकत नाहीत. ते श्वास घेण्यासाठी दर ३०-४० सेकंदांनी पाण्याच्या वर येतात.
डॉल्फिन गणना २०२५
मार्च २०२५ च्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोड्या पाण्यात अधिवास करणाऱ्या डॉल्फिनच्या गणनेचा अहवाल प्रकाशित झाला.
या अहवालानुसार:
- गंगेज रिव्हर डॉल्फिन्सची संख्या: ६,३२४
- इंडस रिव्हर डॉल्फिन्सची संख्या: ३

डॉल्फिन्सच्या दोन्ही प्रजाती आययूसीएनच्या लाल यादीत संकटग्रस्त म्हणून नामांकित आहेत.
भारतात डॉल्फिन्स कुठे आढळतात?
गंगेतील डॉल्फिन अभयारण्य (बिहार, भागलपूर)
- स्थापना: १९९१
- हे भारतातील पहिले डॉल्फिन वेधशाळा आहे.
इतर महत्त्वाची ठिकाणे:
- गोवा: डो-पॅसिफिक हंपबॅक डॉल्फिन आणि फिनलेस पोर्पोइसेस
- अंदमान बेट: कॉमन डॉल्फिन, स्पिनर डॉल्फिन, बॉटलनोज डॉल्फिन, स्पॉटेड डॉल्फिन
- नेत्राणी बेट (कर्नाटक): बॉटलनोज डॉल्फिन
- मालवण (महाराष्ट्र): डॉल्फिन पाहण्याचे चांगले ठिकाण
- पाल्क बे: पट्टेदार डॉल्फिन आणि डुगोंग
राष्ट्रीय गंगा डॉल्फिन दिवस
दरवर्षी ५ ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय स्वच्छ गंगा मिशनद्वारे गंगा डॉल्फिन दिवस म्हणून साजरा केला जातो.
डॉल्फिनला असलेले धोके:
- जल विकास प्रकल्प
- नद्यांची विषारीता
- मासेमारांच्या उपकरणात अडकल्याने होणारे अपघाती मृत्यू
भारताने डॉल्फिन्सच्या संरक्षणासाठी ‘प्रोजेक्ट डॉल्फिन‘ हा उपक्रम हाती घेतला आहे.
तर बालमित्रांनो, कशी वाटली भारतातील डॉल्फिन्सबद्दलची माहिती? ही माहिती तुमच्या मित्रमंडळींनाही सांगा. पुढच्या लेखात आपण आणखी एका वैविध्यपूर्ण प्राण्याची भेट घडवून आणूया!