कलिंगड, Image credit: https://pixabay.com/
उन्हाळा आला की सगळी जनता थेट “कलिंगड मोड” मध्ये शिफ्ट होते! एसीपेक्षा जास्त विश्वास कलिंगडावर ठेवणारे आपण, थोडी जरी गरमी वाढली तरी मनात पहिला विचार काय येतो?
“एक कलिंगड घेऊन येते का रे?!”
घरात ४ लोक असोत की १४ – मोठं टम्म फडफडीत, थोडं थंड आणि चकचकीत लालसर कलिंगड (तरबूज / Watermelon) टेबलावर आलं की सगळे गोळा होतात! पण…
तुम्हाला माहितेय का, की काही व्यापारी कलिंगड चमकदार दिसावं म्हणून त्यावर रसायनं फासतात?
हो हो, उगीचच फोडलेलं कलिंगड जास्तच लाजवतंय का? तर मग सावध व्हा – कदाचित ते भेसळयुक्त असू शकतं!
चिंता करू नका! आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय एकदम सोपा, घरबसल्या करता येणारा “कलिंगड भेसळ तपासणी चाचणी” – ज्यासाठी ना तुम्हाला लॅब लागेल, ना एक्स्पर्ट. फक्त थोडं पाणी, एक कापूस गोळा आणि तुमचं निरीक्षण पुरेसं आहे!
आज आपण जाणून घेणार आहोत की घरीच कलिंगडात भेसळ ओळखण्याचे घरगुती उपाय.
काही व्यापारी अधिक विक्रीसाठी कलिंगडाला कृत्रिम लाल रंग लावतात. हे रंग बाजारात चकाकी आणतात, पण आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरतात. हे रंग इंडस्ट्रियल डाईज किंवा अघोषित रंगद्रव्य असू शकतात, जे पचनसंस्थेस हानी पोहोचवतात आणि लहान मुलांसाठी तर अत्यंत धोकादायक असतात.
कसे करावे:
निकाल:
कसे करावे:
निकाल:
भेसळयुक्त रंगांमुळे होऊ शकणाऱ्या समस्या:
उन्हाळ्याचा राजा कलिंगड खाणं आनंददायक असतं, पण त्याचबरोबर ते सुरक्षितही असायला हवं. भेसळीत कलिंगड फक्त दिसायला सुंदर असतं, पण शरीरासाठी तितकंच घातक. म्हणूनच, “आधी तपासा, मग खा!” ही सवय लावा. घरातल्या लहानग्यांना सुरक्षित आणि नैसर्गिक फळांचा अनुभव देण्यासाठी आपली ही छोटी काळजी खूप मोठा बदल घडवू शकते.
अधिक माहिती आणि घरगुती चाचण्यांसाठी:
खाद्यपदार्थांतील भेसळ ओळखण्यासाठी अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने Eat Right India मोहिमेअंतर्गत DART (Detect Adulteration with Rapid Test) नावाचा उपक्रम सुरू केला आहे. या वेबसाइटवर तुम्हाला भेसळ ओळखण्यासाठी विविध घरगुती चाचण्या मराठीत आणि इंग्रजीत सविस्तर दिल्या आहेत.
जर तुम्हाला कलिंगडासोबत इतर फळं, भाज्या, दूध, मसाले, तेल अशा अनेक पदार्थांची शंका वाटत असेल, तर ही लिंक नक्की वापरून बघा!
"Income Tax", "ITR", "ITR Filing", "ITR Filing Deadline" - जुलै महिना आला की हे शब्द गुगल वर सर्वाधिक शोधले जातात.… Read More
भारतातील अग्रगण्य IT सेवा कंपनी TCS (Tata Consultancy Services) ने अलीकडे 12,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची घोषणा केली. ही घटना… Read More
आज आरोग्य आणि पोषण या विषयांमध्ये लोकांचा रस झपाट्याने वाढत आहे. या प्रवाहात “व्हे प्रोटीन”/ (Whey Protein) हा शब्द अनेकदा… Read More