Food and Nutrition

घरीच करा तपासणी: कलिंगडात भेसळ ओळखण्याचे घरगुती उपाय

उन्हाळा आला की सगळी जनता थेट “कलिंगड मोड” मध्ये शिफ्ट होते! एसीपेक्षा जास्त विश्वास कलिंगडावर ठेवणारे आपण, थोडी जरी गरमी वाढली तरी मनात पहिला विचार काय येतो?

एक कलिंगड घेऊन येते का रे?!”

घरात ४ लोक असोत की १४ – मोठं टम्म फडफडीत, थोडं थंड आणि चकचकीत लालसर कलिंगड (तरबूज / Watermelon) टेबलावर आलं की सगळे गोळा होतात! पण…

तुम्हाला माहितेय का, की काही व्यापारी कलिंगड चमकदार दिसावं म्हणून त्यावर रसायनं फासतात?

हो हो, उगीचच फोडलेलं कलिंगड जास्तच लाजवतंय का? तर मग सावध व्हा – कदाचित ते भेसळयुक्त असू शकतं!

चिंता करू नका! आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय एकदम सोपा, घरबसल्या करता येणारा “कलिंगड भेसळ तपासणी चाचणी” – ज्यासाठी ना तुम्हाला लॅब लागेल, ना एक्स्पर्ट. फक्त थोडं पाणी, एक कापूस गोळा आणि तुमचं निरीक्षण पुरेसं आहे!

आज आपण जाणून घेणार आहोत की घरीच कलिंगडात भेसळ ओळखण्याचे घरगुती उपाय.

भेसळ का आणि कशी केली जाते?

काही व्यापारी अधिक विक्रीसाठी कलिंगडाला कृत्रिम लाल रंग लावतात. हे रंग बाजारात चकाकी आणतात, पण आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरतात. हे रंग इंडस्ट्रियल डाईज किंवा अघोषित रंगद्रव्य असू शकतात, जे पचनसंस्थेस हानी पोहोचवतात आणि लहान मुलांसाठी तर अत्यंत धोकादायक असतात.

Related Post

कलिंगडात भेसळ ओळखण्याचे घरगुती उपाय

१. कॉटन बॉल टेस्ट (Cotton Ball Test)

कसे करावे:

  • एक पांढरा कॉटन बॉल (किंवा स्वच्छ कापूस) घ्या.
  • कलिंगड कापून त्याच्या लाल गरावर हलक्या हाताने घासा.
  • कापूस तपासा.

निकाल:

  • जर कापूस साफ राहिला तर भेसळ नाही.
  • जर कापूस पिंगट किंवा लालसर झाला, तर कलिंगडात कृत्रिम रंग मिसळलेला असू शकतो.

२. पाण्याचा प्रयोग (Water Test)

कसे करावे:

  • कलिंगडाच्या गराचे काही तुकडे एका पारदर्शक पाण्याच्या ग्लासमध्ये टाका.
  • १० मिनिटे सोडा.

निकाल:

  • पाणी जर पिंगट किंवा लालसर झाले तर त्या गरावर रंग लावलेला असू शकतो.
  • पाणी साफ राहिल्यास ते नैसर्गिक आहे.

३. जास्त चकाकी व अनैसर्गिक रंगावर लक्ष ठेवा

  • कलिंगडाचा गर अति चकाकीदार, गडद लाल आणि सम दिसणारा असेल, तर सावध व्हा.
  • नैसर्गिक कलिंगडात थोडा वेढा, थोडी असमानता, नैसर्गिक छटा असतात.

आरोग्याचा प्रश्न

भेसळयुक्त रंगांमुळे होऊ शकणाऱ्या समस्या:

  • पोटदुखी, जुलाब
  • उलट्या किंवा मळमळ
  • लहान मुलांमध्ये पचनसंस्था बिघडणे
  • दीर्घकालीन वापरात यकृतावर ताण

सुरक्षिततेसाठी काही टीप्स:

  • शक्य असल्यास स्थानिक शेतकरी थेट विक्री बाजार, आठवडे बाजार, किंवा विश्वसनीय फळ विक्रेत्यांकडून कलिंगड खरेदी करा. अनेकवेळा शेतकऱ्यांकडून थेट येणारी फळं ही अधिक नैसर्गिक आणि भेसळमुक्त असतात.
  • फार आकर्षक, गडद रंग असलेल्या कलिंगडांपासून सावध रहा.
  • घरच्याघरी वरील चाचण्या करून खात्री करा.

उन्हाळ्याचा राजा कलिंगड खाणं आनंददायक असतं, पण त्याचबरोबर ते सुरक्षितही असायला हवं. भेसळीत कलिंगड फक्त दिसायला सुंदर असतं, पण शरीरासाठी तितकंच घातक. म्हणूनच, आधी तपासा, मग खा!” ही सवय लावा. घरातल्या लहानग्यांना सुरक्षित आणि नैसर्गिक फळांचा अनुभव देण्यासाठी आपली ही छोटी काळजी खूप मोठा बदल घडवू शकते.

अधिक माहिती आणि घरगुती चाचण्यांसाठी:
खाद्यपदार्थांतील भेसळ ओळखण्यासाठी अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने Eat Right India मोहिमेअंतर्गत DART (Detect Adulteration with Rapid Test) नावाचा उपक्रम सुरू केला आहे. या वेबसाइटवर तुम्हाला भेसळ ओळखण्यासाठी विविध घरगुती चाचण्या मराठीत आणि इंग्रजीत सविस्तर दिल्या आहेत.

जर तुम्हाला कलिंगडासोबत इतर फळं, भाज्या, दूध, मसाले, तेल अशा अनेक पदार्थांची शंका वाटत असेल, तर ही लिंक नक्की वापरून बघा!

प्रणाली तेलंग

प्रणाली AG मराठी ची संस्थापक आणि संपादक आहेत. ती कृषी, ग्रामीण विकास आणि शाश्वत जीवनावर ताज्या बातम्या आणि लेख लिहिते. तिने पर्यावरण शास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा देखील पूर्ण केला आहे. ती एक प्रशिक्षित शिक्षिकाही आहे. तिने 5 वर्षे शिक्षण, संशोधन आणि विकास क्षेत्रात काम केले आहे.

Recent Posts

व्हे प्रोटीन म्हणजे काय?

आज आरोग्य आणि पोषण या विषयांमध्ये लोकांचा रस झपाट्याने वाढत आहे. या प्रवाहात “व्हे प्रोटीन”/ (Whey Protein)  हा शब्द अनेकदा… Read More

विहिरी गोलच का असतात?

आपण भारतात कुठेही गेलो, तरी बहुतांश ठिकाणी विहिरींचा आकार गोलसरच आढळतो. मग ती पारंपरिक विहीर असो, बोअरवेल असो, किंवा गावातील… Read More

वाहन स्क्रॅपिंग धोरण व महाराष्ट्रातील १५% कर सवलत

आजच्या काळात भारतात अनेक जुनी वाहने रस्त्यावर धावत आहेत जी प्रदूषण वाढवतात आणि भीतीदायक बनतात. अशा पार्श्वभूमीवर भारत सरकारने मार्च… Read More