Free range poultry, Image credit: Steven Van Elk, https://www.pexels.com/
भारतामध्ये कोंबडी पालन करताना एक महत्त्वाचा प्रश्न समोर येतो — खरी देशी कोंबडी कोणती? आणि देशी अंडी म्हणजे नेमकं काय? अनेक वेळा बाजारात जे ‘देशी अंडी’ (desi/ country eggs) म्हणून विकले जातात, ती प्रत्यक्षात देशी-टाईप (improved/desi-type) जातींच्या कोंबड्यांची अंडी असतात. या लेखात आपण देशी व देशी टाईप कोंबड्यांमधील फरक, अंडी व मांसाचे पोषणमूल्य, NBAGR नोंदणीबाबत माहिती आणि बाजारातील फसवणुकीबाबत स्पष्टपणे जाणून घेणार आहोत.
देशी कोंबड्या म्हणजे भारतात पारंपरिक पद्धतीने विकसित झालेल्या मूळ (native) जाती. यामध्ये Kadaknath (कडकनाथ), Aseel, Nicobari, Ghagus, Haringhata Black अशा काही प्रमुख जातींचा समावेश होतो. या जातींची नोंदणी NBAGR (National Bureau of Animal Genetic Resources) मार्फत केली जाते. NBAGR ही संस्था देशी प्रजातींची ओळख, नोंदणी व संरक्षण यासाठी कार्यरत आहे.
टीप: वरील जाती विविध राज्यांमध्ये स्थानिक नावांनी ओळखल्या जातात. अनेक पारंपरिक जाती विशिष्ट भौगोलिक क्षेत्राशी निगडीत असून त्यांचे अद्ययावत नोंद आणि माहिती NBAGR वेबसाइटवर उपलब्ध आहे. NBAGR कडून अद्ययावत देशी जातींची यादी येथे पाहता येते – https://nbagr.icar.gov.in
देशी-टाईप कोंबड्या म्हणजे शासकीय संस्थांनी किंवा खासगी कंपन्यांनी विकसित केलेल्या ‘सुधारित / इम्प्रुव्हड जाती (Improved breeds)’. त्या देशी कोंबडीसारख्या दिसतात पण त्यांचे उत्पादन अधिक (जास्त अंडी/मांस) देण्यासाठी सुधारित केलेले असते.
हे पक्षी शासकीय योजनांतून शेतकऱ्यांना वाटले जातात आणि अनेक वेळा त्यांचे अंडी ‘देशी’ म्हणून बाजारात विकले जाते.
| घटक | देशी अंडी | देशी टाईप अंडी |
| रंग | गडद तपकिरी/केसरी | थोडक्याचसा तपकिरी |
| चव | अधिक स्वादिष्ट | तुलनेत सौम्य |
| पोषण | अधिक कॅरोटिनॉईड्स, ओमेगा 3 | थोडेसे कमी |
| किंमत | Rs. 15–Rs. 25 प्रति अंडं | Rs. 10–Rs. 15 प्रति अंडं |
| घटक | देशी कोंबडीचे मांस | देशी टाईप कोंबडीचे मांस |
| चव | अधिक भरदार, पारंपरिक | सौम्य चव |
| पोषण | प्रोटीन भरपूर, चरबी कमी | चरबी तुलनेने थोडी जास्त |
| किंमत | Rs. 600–Rs. 800/kg (कोंबड्याला अधिक किंमत) | Rs.250–Rs. 400/kg |
होय, पण संपूर्ण चित्र समजून घेणे महत्त्वाचे आहे.
टीप: फक्त अंड्याचा रंग पाहून त्याचे पोषण ठरवता येत नाही. उत्पादनपद्धती, खाद्य आणि पक्ष्याचा प्रकार महत्त्वाचा असतो.
आज बाजारात ‘देशी अंडी’ या नावाखाली मोठ्या प्रमाणावर देशी टाईप कोंबड्यांची अंडी विकली जातात. त्यामुळे:
‘देशी अंडी’ किंवा ‘देशी कोंबडी’ ही फक्त एक मार्केटिंग टर्म नसून ती एका विशिष्ट जैविक ओळखीशी निगडीत आहे. ग्राहकांनी खरी देशी कोंबडी कोणती, आणि देशी/ देशी टाईप यातील फरक समजून घेऊन सजग खरेदी करावी. NBAGR नोंदणीकृत देशी जातींच्या संवर्धनासाठी शेतकरी आणि ग्राहक दोघांनीही पुढाकार घ्यावा.
भारताच्या ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांची परिस्थिती जवळजवळ सारखीच असते. घरात शेती, पावसावर अवलंबून उत्पन्न, आणि शिक्षण म्हणजे आयुष्य बदलण्याची एकमेव… Read More
आजच्या जागतिक घडामोडींमुळे इराण पुन्हा चर्चेत आहे. अर्थव्यवस्था, ऊर्जा संसाधने आणि भू-राजकारण या विषयांबरोबरच इराणच्या शेतीबद्दलही उत्सुकता वाढली आहे. पहिल्या… Read More
दरवर्षी ५ डिसेंबर रोजी जगभरात जागतिक मृदा दिवस (World Soil Day) साजरा केला जातो. FAO आणि संयुक्त राष्ट्रांच्या पुढाकाराने सुरू… Read More