Agriculture

डिहायड्रेटेड फळं आणि भाज्या: टिकाऊ शेतीचा नवा मार्ग

डिहायड्रेटेड फळं आणि भाज्या (Dehydrated Fruits and Vegetables) म्हणजे नियंत्रित पद्धतीनं पाणी काढलेले पदार्थ, ज्यामुळे त्यांचा टिकाव काही महिने ते वर्षभरापर्यंत वाढतो, वाहतूक सोपी होते आणि शेतकऱ्यांना मूल्यवर्धनाची संधी मिळते.

भारतामध्ये दरवर्षी लाखो टन फळं व भाज्या पोस्ट-हार्वेस्ट नुकसान (post-harvest loss) म्हणून वाया जातात. जादा उत्पादनाचं योग्य साठवण नसल्यामुळे शेतकऱ्यांना कमी दर मिळतात आणि मोठं नुकसान होतं. यावर एक प्रभावी उपाय म्हणजे डिहायड्रेशन (Dehydration).

डिहायड्रेटेड फळं व भाज्या रेस्टॉरंट्स, केटरिंग कंपन्या, रेडी-टू-ईट (ready-to-eat) ब्रँड्स यांना मोठ्या प्रमाणात लागतात. त्यामुळे त्यांना एक स्थिर बाजारपेठ मिळू शकते.

बाजारपेठ व संधी

डिहायड्रेटेड फळं व भाज्यांचा बाजार सतत वाढतोय. लोकांच्या जीवनशैलीत वेग वाढल्यामुळे त्यांना टिकाऊ, सोयीस्कर आणि आरोग्यदायी पदार्थ हवे असतात.

  • देशांतर्गत बाजार: हेल्दी स्नॅक्स (healthy snacks), रेडी-टू-कुक (ready-to-cook) पदार्थ, इंस्टंट सूप (instant soup) यासाठी मागणी वाढते आहे.
  • निर्यात बाजार (Export Market): कांदा फ्लेक्स (Onion Flakes), कांदा पावडर (Onion Powder), टोमॅटो पावडर (Tomato Powder), कोथिंबीर (Coriander), पुदीना (Mint) यांसारख्या उत्पादनांना युरोप, अमेरिका आणि मध्य-पूर्व देशांत मोठी मागणी आहे.
  • ऑनलाइन विक्री (E-commerce): Amazon, Flipkart सारख्या प्लॅटफॉर्ममुळे शेतकऱ्यांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचता येतं.
  • महिला स्वयं-सहायता गट (SHGs) आणि लघुउद्योग: कमी प्रमाणात सुरुवात करूनही स्थानिक पातळीवर चांगलं उत्पन्न मिळवता येतं.

डिहायड्रेशन का आवश्यक?

फळं आणि भाज्या हे लवकर खराब होणारे  उत्पादन आहे. योग्य साठवण, वाहतूक आणि प्रक्रिया न केल्यास मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं.

  • जागतिक स्तरावर: दरवर्षी सुमारे 675 दशलक्ष मेट्रिक टन (million metric tons) फळं व भाज्या उत्पादित होतात. पण त्यातून तब्बल 1.3 अब्ज टन (billion ton) वाया जातं.
  • भारतात: देश दरवर्षी सुमारे 86.6 दशलक्ष मेट्रिक टन फळं व भाज्या उत्पादित करतो, पण त्यापैकी सुमारे 5.6 दशलक्ष टन वाया जातात. भारतात एकट्याचं 18% उत्पादन वाया जातं, ज्याची किंमत साधारण Rs. 13,300 कोटी एवढी आहे.

संदर्भ: IJCRT, 2023

यामुळे फळं व भाज्यांचं पोस्ट-हार्वेस्ट नुकसान हा केवळ शेतकऱ्यांसाठी आर्थिक तोटा नाही, तर संपूर्ण अन्नसाखळी आणि ग्राहकांसाठीही गंभीर समस्या आहे.

डिहायड्रेशन फक्त साठवणूक करण्याचं साधन नाही, तर शेतकऱ्यांसाठी टिकावाचं साधन आहे.

Related Post
  • पोस्ट-हार्वेस्ट नुकसान कमी: हंगामात जास्त झालेलं उत्पादन सुकवून साठवलं, तर ते वाया जात नाही.
  • किंमत स्थिरता: हंगामाबाहेरही विक्री करता येते – शेतकऱ्यांना जास्त दर मिळतात.
  • साठवण व वाहतूक सोपी: पाण्याचं वजन कमी झाल्यामुळे वाहतूक खर्च व साठवण सोपी होते.
  • ग्राहक सोय: वर्षभर उपलब्धता, झटपट शिजवता येणारे पदार्थ, आणि आरोग्यदायी पर्याय.

प्रक्रिया पद्धती

डिहायड्रेशन करण्यासाठी विविध पद्धती वापरल्या जातात, आणि त्यांचा उपयोग शेतकऱ्यांच्या गरजेनुसार ठरतो.

  • सूर्यप्रकाशात सुकवण (Sun Drying): पारंपरिक व कमी खर्चिक, पण वेळ जास्त लागतो.
  • सौर ड्रायर (Solar Dryer): ग्रामीण भागासाठी सर्वोत्तम; कमी खर्चात जलद व सुरक्षित सुकवण.
  • इलेक्ट्रिक ड्रायर (Electric Dryer): उत्पादन नियंत्रित पद्धतीने व लवकर सुकवता येतं, पण वीज व गुंतवणूक जास्त लागते.
  • फ्रीझ ड्रायिंग (Freeze Drying): निर्यातीसाठी उच्च दर्जाचं उत्पादन, चव-गुणधर्म चांगले टिकतात, पण खर्चिक.

प्रमाणपत्रे / मानकं

ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी फक्त उत्पादन पुरेसं नाही, तर विश्वासार्हता व अन्नसुरक्षा (food safety) महत्त्वाची असते.

भारतामध्ये (India):

  • FSSAI परवाना (License): अन्न प्रक्रिया व विक्रीसाठी आवश्यक.
  • AGMARK / BIS: गुणवत्ता मानकं दाखवण्यासाठी उपयुक्त.
  • APEDA नोंदणी (Export Registration): निर्यातीसाठी गरजेची.

निर्यात (Export):

  • HACCP / ISO 22000: अन्नसुरक्षा व्यवस्थापन प्रणाली.
  • Codex / EU / US FDA नियम: परदेशी बाजारातील अपेक्षा.
  • Phytosanitary प्रमाणपत्र: निर्यातीसाठी वनस्पती आरोग्य तपासणी.

मोठे खरेदीदार व रिटेलर GFSI प्रमाणपत्रं (FSSC 22000, BRCGS, IFS, SQF) आणि सेंद्रिय (Organic – NPOP/ PGS-India, EU/US) प्रमाणपत्रं मागतात.

आव्हानं

डिहायड्रेटेड फळं-भाज्यांचा व्यवसाय फायद्याचा आहे, पण काही अडचणींना सामोरं जावं लागतं.

  • उपकरणे व गुंतवणूक: ड्रायर आणि पॅकिंग मशीनसाठी सुरुवातीला पैसा लागतो. यावर उपाय म्हणजे शेतकरी गटांनी (FPO) सहकारी पद्धतीने यंत्रसामग्री घेणे.
  • गुणवत्ता राखणं: उत्पादन करताना स्वच्छता, तापमान आणि आर्द्रता यांचं नियंत्रण गरजेचं आहे. प्रशिक्षण आणि मानक कार्यपद्धती /Standard Operating Procedures (SOPs) वापरल्यास ही अडचण कमी होते.
  • मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा: मार्केटिंग आणि ब्रँडिंगवर लहान शेतकऱ्यांना काम करावं लागतं. स्थानिक बाजार आणि ऑनलाइन विक्री हे पर्याय उपयुक्त ठरतात.
  • प्रशिक्षण व माहिती अभाव: अनेकांना तांत्रिक माहिती नसते. कृषी विद्यापीठं, सरकारी योजना आणि NGOs प्रशिक्षण देतात.

डिहायड्रेशन ही शेतकऱ्यांसाठी उत्पन्न वाढवणारी, पोस्ट-हार्वेस्ट नुकसान कमी करणारी आणि बाजारपेठेत मूल्यवर्धन करणारी सोपी प्रक्रिया आहे.

योग्य प्रमाणपत्रं, आधुनिक पॅकिंग आणि थेट बाजारपेठेची जोड मिळाल्यास डिहायड्रेटेड फळं व भाज्या हे ग्रामीण भागातील लघुउद्योग आणि निर्यातीसाठी एक मोठी संधी ठरू शकतात.

प्रणाली तेलंग

प्रणाली AG मराठी ची संस्थापक आणि संपादक आहेत. ती कृषी, ग्रामीण विकास आणि शाश्वत जीवनावर ताज्या बातम्या आणि लेख लिहिते. तिने पर्यावरण शास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा देखील पूर्ण केला आहे. ती एक प्रशिक्षित शिक्षिकाही आहे. तिने 5 वर्षे शिक्षण, संशोधन आणि विकास क्षेत्रात काम केले आहे.

Recent Posts

पर्माकल्चर: शेतकऱ्यांसाठी टिकाऊ शेतीचा मार्ग

आजचा शेतकरी मोठ्या संकटातून जातोय. रासायनिक खतं, कीटकनाशके, पाणी-वीज यांचा खर्च दिवसेंदिवस वाढतोय; पण पिकांचे भाव मात्र जागच्या जागीच आहेत.… Read More

ग्रीन वॉटर म्हणजे नेमकं काय?

"पाणी म्हणजेच जीवन" हे आपण शालेय जीवनापासून ऐकत आलो आहोत. पण पाण्याचे प्रकार काय असतात हे आपल्याला नेहमीच माहिती नसते.… Read More

काजवा महोत्सव: निसर्गाचा एक जादुई अनुभव

मे महिना सुरू झाला की पावसाळ्यापूर्वीचं दमट वातावरण जाणवायला लागतं आणि त्याच वेळी एक अद्भुत निसर्गनाट्य घडू लागतं. संध्याकाळी झाडांवर… Read More