Agriculture

पॉवर वीडर आणि पॉवर टिलरबद्दल संपूर्ण माहिती

भारतातील लहान आणि मध्यम शेतकरी अजूनही पारंपरिक पद्धतीने शेती करत आहेत. मात्र मजुरांच्या कमतरतेमुळे आणि उत्पादन वाढवण्याच्या गरजेमुळे आता यांत्रिकीकरण अपरिहार्य बनले आहे. विशेषतः “लघु यांत्रिकी शेती उपकरणे” (Small-Scale Mechanised Agricultural Equipment) ही वेळ आणि श्रम वाचवणारी, अधिक प्रभावी शेतीसाठी उपयुक्त ठरत आहेत. यामध्ये पॉवर वीडर आणि पॉवर टिलर हे दोन महत्त्वाचे यंत्रप्रकार आहेत.

दोन मुख्य प्रकार

पॉवर वीडर (Power Weeder):

  • पिकांच्या ओळीमधील तण हटवण्यासाठी वापरले जाणारे लहान यंत्र.
  • भात, भाजीपाला, ऊस, झाडे असलेल्या बागायत क्षेत्रांमध्ये अतिशय उपयुक्त.
  • वजनाने हलके आणि चालवायला सोपे.

पॉवर टिलर (Power Tiller):

  • मातीची नांगरणी, पेरणीपूर्व मशागत, ट्रॉली ओढणे अशा अनेक कामांसाठी वापरले जाणारे बहुपर्यायी यंत्र.
  • ट्रॅक्टरला पर्याय म्हणून वापरले जाते, विशेषतः लहान शेतांमध्ये.
  • जास्त ताकद आणि अधिक अटॅचमेंट्ससह उपलब्ध.

पॉवर वीडर आणि पॉवर टिलर यामधील मुख्य फरक

घटकपॉवर वीडरपॉवर टिलर
वापरतण नियंत्रण, आंतर मशागतनांगरणी, रोटावेटर, ट्रॉली ओढणे
ताकद (HP)3.5 ते 7.5 HP8 ते 18 HP
वजनहलके (60-120 kg)जड (300-600 kg)
किंमतरु. 30,000 ते 70,000रु. 1.5 लाख ते 3 लाख
इंधनपेट्रोल / डिझेलडिझेल
अटॅचमेंट्समर्यादितअधिक विविध प्रकारचे

संशोधन पत्रात पहा – भारतीय बाजारपेठेतील पोर्टेबल वीडर्स आणि पॉवर टिलरचे तुलनात्मक विश्लेषण.

रोटरी फंक्शन: महत्त्व आणि उपयोग

पॉवर वीडर आणि पॉवर टिलर ही दोन्ही यंत्रे शेतीतील तण काढणी, मशागत आणि जमिन तयार करण्यासाठी वापरली जातात. या यंत्रांमध्ये असलेली टिलिंग मेकॅनिझम (Tilling Mechanism) – म्हणजे ब्लेड्स किंवा टाईन्स जमिनीत कसे व कुठून फिरतात – यावर त्यांची कार्यक्षमता ठरते.

टिलिंग मेकॅनिझमनुसार हे तीन प्रकार सर्वाधिक वापरात आहेत:

सेंटर रोटरी (Center Rotary Type)

  • या प्रकारात रोटरी ब्लेड्स यंत्राच्या मध्यभागी असतात. त्यामुळे यंत्र संतुलित राहते आणि मशागत एकसमान होते.
  • हा प्रकार सामान्य शेतीसाठी – जसे भाजीपाला, डाळी किंवा धान्य पिकांसाठी – सामान्य खोलीतील नांगरणी व तण काढणीसाठी अतिशय उपयुक्त आहे.

बॅक रोटरी (Back Rotary Type)

  • या प्रकारात रोटरी युनिट यंत्राच्या मागच्या बाजूस असतं.
  • हे यंत्र जमिन खोलवर उलथवण्यासाठी (Deep tilling) आणि मधल्या ओळींमध्ये (intercultivation) काम करण्यासाठी वापरले जाते.
  • घट्ट किंवा ओलसर जमिनीत खोल मशागतीसाठी हा प्रकार अधिक प्रभावी ठरतो.

फ्रंट रोटरी (Front Rotary Type)

  • या प्रकारात टिलिंग यंत्रणा यंत्राच्या समोरच्या भागात बसवलेली असते. त्यामुळे ऑपरेटरला समोरचं काम स्पष्ट दिसतं आणि नियंत्रित करता येतं.
  • हे यंत्र जमिनीचा पृष्ठभाग फोडण्यासाठी व तण काढण्यासाठी उत्कृष्ट ठरतं.
  • हलकी व मध्यम जमिन तयार करण्यासाठी हा प्रकार अधिक सोयीस्कर असतो.

अटॅचमेंट्स आणि अपेक्षित कामाचे स्वरूप

यंत्रप्रकारअटॅचमेंट्सउपयोग
पॉवर वीडररोटरी ब्लेड्सतण नियंत्रण, आंतर मशागत
प्लँटर अटॅचमेंटरांगेत बी पेरणी
फर्टिलायझर अटॅचमेंटखते टाकण्यासाठी
पॉवर टिलररोटावेटरपेरणीपूर्व मशागत
ट्रॉलीमाल वाहतूक
प्लाऊ / डिस्क प्लाऊखोल नांगरणी
पंपसेट / थ्रेशरपाणीपुरवठा / कापणी नंतर प्रक्रिया
सीड ड्रिल / प्लँटरएकसंध आणि सरळ रांगेतील पेरणी

Related Post

तुमच्यासाठी योग्य पॉवर टिलर किंवा वीडर कसं निवडाल?

शेतीतील मशागत आणि तण काढणीचं काम जलद, कार्यक्षम आणि कमी श्रमात करण्यासाठी पॉवर टिलर आणि पॉवर वीडर हे महत्त्वाचे साधन आहेत. पण बाजारात अनेक मॉडेल्स, आकार आणि क्षमता उपलब्ध असल्याने गोंधळ होणं स्वाभाविक आहे.

खालील मार्गदर्शक मुद्दे लक्षात घेतल्यास योग्य निवड करणं सोपं जाईल

शेताचं आकारयोग्य यंत्रकारण
१ एकरपर्यंत / बागायती किंवा भाजीपाला शेतीलहान पॉवर वीडर (सेंटर रोटरी)हलकं, वळवणं सोपं, अरुंद ओळींमध्ये काम करण्यास योग्य.
१–३ एकर / मिश्र पिकंकॉम्पॅक्ट पॉवर टिलर (सेंटर रोटरी /बॅक रोटरी)जमिन तयार करणं आणि मधल्या ओळींमध्ये तण काढणी – दोन्ही कामांसाठी योग्य.
३ एकरपेक्षा जास्त / मोठी पिकं (ऊस, मका, सोयाबीन)मध्यम ते मोठा पॉवर टिलर (बॅक रोटरी)खोल मशागत, जास्त कार्यक्षमता, मोठ्या क्षेत्रासाठी उपयुक्त.

आघाडीचे ब्रँड्स

व्हीएसटी शक्ती (VST Shakti), किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लिमिटेड (Kirloskar Oil Engines Ltd. – KOEL), बीसीएस इंडिया (BCS India), कॅमको – केरळ अॅग्रो मशीनरी कॉर्पोरेशन (KAMCO – Kerala Agro Machinery Corporation), स्प्रेमन अॅग्रो (Sprayman Agro, होंडा पॉवर इक्विपमेंट (Honda Power Equipment), ग्रीव्ह्स कॉटन लिमिटेड (Greaves Cotton Ltd.), श्राची अॅग्रो (Shrachi Agro)

खरेदीपूर्वी विचारात घेण्याजोग्या गोष्टी:

  • आपल्या शेताचे क्षेत्रफळ आणि जमीन प्रकार
  • कोणत्या पिकासाठी आणि कामासाठी यंत्र हवयं?
  • विश्वासार्ह इंजिन निवडा: भारतातील अनेक पॉवर टिलर आणि वीडर उत्पादक हे प्रत्यक्ष निर्माते नसून assembler असतात – म्हणजे ते विविध कंपन्यांच्या इंजिन्सचा वापर करून स्वतःचं मॉडेल तयार करतात. त्यामुळे खरेदी करताना इंजिन कोणत्या ब्रँडचं आहे हे नक्की तपासा. विश्वसनीय ब्रँड्समध्ये Honda, Rato, Kama यांसारखी इंजिन्स अधिक टिकाऊ, इंधन कार्यक्षम आणि सुटे भाग सहज उपलब्ध असतात. अपरिचित किंवा स्थानिक इंजिन्स वापरलेल्या यंत्रांमुळे नंतर सेवा आणि देखभालीत अडचणी येऊ शकतात.
  • IS 6690 (1981) प्रमाणित ब्लेड तपासा: रोटावेटर किंवा टिलरमधील ब्लेड्स IS 6690 (1981) या भारतीय मानकानुसार बनवलेले आहेत का हे खरेदीपूर्वी नक्की तपासा. या मानकात ब्लेड्सची कठोरता, आकार, आणि धातूंची गुणवत्ता निश्चित केलेली असते, ज्यामुळे ते अधिक टिकाऊ, कार्यक्षम आणि सुरक्षित ठरतात. अशा ब्लेड्समुळे जमिन मशागत सम प्रमाणात होते आणि यंत्राचं आयुष्यही वाढतं.
  • FMTTI प्रमाणनाची गरज: Farm Machinery Training & Testing Institutes (FMTTI) हे भारत सरकारच्या कृषि यांत्रिकीकरण विभागांतर्गत काम करणारी राष्ट्रीय संस्था आहे जी कृषी यंत्रांची प्रशिक्षण व प्रमाणन चाचणी करते. सबसिडी योजनांतर्गत व सरकारी खरेदी यंत्रांसाठी फक्त FMTTI मान्यता मिळालेली यंत्रेच पात्र ठरतात.
  • शासकीय अनुदान आणि सबसिडीची माहिती (जसे की कृषी यांत्रिकीकरण योजना, जिल्हा कृषि अधिकारी यांच्याकडून अर्जाची प्रक्रिया)
  • अटॅचमेंट्सची सोय आणि किफायतशीरता
  • इंधन खपत आणि देखभाल खर्च
  • स्थानिक सेवा केंद्रांची आणि स्पेअर पार्ट्सची उपलब्धता
  • ब्रँडची विश्वसनीयता, वॉरंटी सुविधा आणि ग्राहक सेवेचा अनुभव

यंत्र वापरताना घ्यावयाची काळजी:

  • यंत्र सुरू करण्यापूर्वी सर्व नट-बोल्ट तपासणे
  • योग्य प्रमाणात इंधन व ल्युब्रीकंट वापरणे
  • शूज, दस्ताने, आणि कानाचे रक्षण करणारी साधने वापरणे
  • यंत्र चालवताना लहान मुले किंवा जनावरे दूर ठेवणे
  • नियमित सर्व्हिसिंग व देखभाल
  • शेतात उंचसखल जागांवर वापरताना विशेष काळजी

लघु यांत्रिकी शेती उपकरणे म्हणजेच पॉवर वीडर आणि पॉवर टिलर शेतकऱ्यांसाठी वेळ, श्रम आणि खर्च वाचवणारे आधुनिक पर्याय आहेत. योग्य यंत्र निवडल्यास उत्पादनक्षमता वाढते आणि शेती अधिक सुलभ बनते.

प्रणाली तेलंग

प्रणाली AG मराठी ची संस्थापक आणि संपादक आहेत. ती कृषी, ग्रामीण विकास आणि शाश्वत जीवनावर ताज्या बातम्या आणि लेख लिहिते. तिने पर्यावरण शास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा देखील पूर्ण केला आहे. ती एक प्रशिक्षित शिक्षिकाही आहे. तिने 5 वर्षे शिक्षण, संशोधन आणि विकास क्षेत्रात काम केले आहे.

View Comments

Recent Posts

चक दे! भारत: भारतीय महिला क्रिकेटचा सुवर्णअध्याय

२०२५ मध्ये भारतीय महिला क्रिकेटने इतिहास रचला — पहिल्यांदाच ICC महिला क्रिकेट विश्वचषक भारताच्या झोळीत आला! हा फक्त एक क्रीडा… Read More

फार्म स्टे व्यवसाय कसा सुरू करावा?

कल्पना करा, एखाद्या शनिवार-रविवारी शहरातील कुटुंब शेतावर येतं, सकाळी पक्ष्यांच्या आवाजाने उठतं, दुपारी पिठलं-भाकरी खातं, आणि संध्याकाळी गावकऱ्यांसोबत शेकोटीजवळ बसून… Read More

नीम बायोपेस्टिसाइड – रासायनिक कीटकनाशकांना पर्यावरणपूरक पर्याय

भारतीय शेतकऱ्यांसाठी कडूलिंब म्हणजे फक्त झाड नाही — ते आपल्या शेतीचं आणि संस्कृतीचं प्रतीक आहे.  जवळजवळ प्रत्येक गावात, मंदिराजवळ किंवा… Read More