बीटरूट चा पराठा
जसे जीवन अनेक रंगानी भरलेले असते त्याचप्रमाणे जर आपल्या आहारात रंगसंगती साधता आली तर किती छान होईल ना! आज आपण बनवूया असाच रंगीत आणि पौष्टिक पराठा, हो पण कुठला कृत्रिम रंग न टाकता बर का! तुम्हाला वाटत असेल की मी यावर गंमत करत आहे आणि कोणत्याही कृत्रिम रंगांशिवाय रंगीत पराठा बनविणे अशक्य आहे. परंतु पौष्टिक, लोहसमृद्ध आणि सहज उपलब्ध बीटरूटसह (Beta vulgaris or Beetroot) हे शक्य आहे. तर, आज आपण बीटरूट चा पराठा बनवणार आहोत.
निरोगी असण्यासोबतच बीट त्याच्या सुंदर लाल रंगामुळेही लोकप्रिय आहे. बीटरूटच्या विशेष चवीमुळे सॅलड्साठी त्याला सगळ्यांची पसंती असते. बीट चवदार असण्यासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. हा बीटरूट चा पराठा सगळ्या वयोगटांसाठी खाण्यास एकदम उत्तम आणि पौष्टीक सुद्धा. झटपट २० मिनिटात तयारही होतो.आता दोन व्यक्तींसाठी पराठा बनवायला काय काय साहित्य लागेल ते बघूया.
बीटचे सेवन केल्याने शरीरातील हिमोग्लोबिन योग्य राहते आणि त्वचा चमकदार आणि सुंदर राहते. बीटमध्ये कॅलरीज कमी असतात आणि जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारख्या पोषक तत्व भरपूर असतात. बीट हे बी-कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे, पोटॅशियम, तांबे आणि मॅग्नेशियम यांचा उत्कृष्ट स्रोत आहे. पोषक तत्वांनी समृद्ध बीट उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी खूप फायदेशीर ठरते. बीटरूटमध्ये भरपूर फायबर आढळते, ज्याचे सेवन केल्याने पचनक्रिया बरोबर राहते आणि बद्धकोष्ठतासारख्या अनेक गंभीर समस्या कमी होतात.बीटचे नियमित सेवन केल्याने मधुमेह आणि हृदयाशी संबंधित जुनाट आजारांचा धोका देखील कमी होतो.
आरोग्य आणि पोषण सूचना: या वेबसाइटवरील आरोग्य आणि पोषण माहिती सामान्य माहिती देण्यासाठी आहे. प्रत्येकाची पोषण गरज वेगवेगळी असू शकते. वैयक्तिक आहार सल्ल्यासाठी आपल्या आरोग्यतज्ञाचा सल्ला घ्या. आम्ही दिलेल्या माहितीची अचूकता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करतो, परंतु ही माहिती वैद्यकीय सल्ला नाही.
दरवर्षी ५ डिसेंबर रोजी जगभरात जागतिक मृदा दिवस (World Soil Day) साजरा केला जातो. FAO आणि संयुक्त राष्ट्रांच्या पुढाकाराने सुरू… Read More
अमेरिकेच्या नवीन व्यापार धोरणांमुळे गेल्या काही महिन्यांपासून भारतीय शेती निर्यातदारांमध्ये मोठी चिंता होती. कारण अमेरिकेने “Reciprocal Tariff” नावाची धोरणात्मक टॅरिफ… Read More
तामिळनाडू राज्यातील नामक्कल जिल्हा आज “Egg Capital of India” म्हणून ओळखला जातो. इथं दररोज तब्बल ६ कोटी अंडी तयार होतात.… Read More