Recipes

बीटरूट चा पराठा – जीवनसत्त्वे आणि खनिजांनी परिपूर्ण

जसे जीवन अनेक रंगानी भरलेले असते त्याचप्रमाणे जर आपल्या आहारात रंगसंगती साधता आली तर किती छान होईल ना!  आज आपण बनवूया असाच रंगीत आणि पौष्टिक पराठा, हो पण कुठला कृत्रिम रंग न टाकता बर का! तुम्हाला वाटत असेल की मी यावर गंमत करत आहे आणि कोणत्याही कृत्रिम रंगांशिवाय रंगीत पराठा बनविणे अशक्य आहे.  परंतु पौष्टिक, लोहसमृद्ध आणि सहज उपलब्ध बीटरूटसह (Beta vulgaris or Beetroot) हे शक्य आहे. तर, आज आपण बीटरूट चा पराठा बनवणार आहोत.

निरोगी असण्यासोबतच बीट त्याच्या सुंदर लाल रंगामुळेही लोकप्रिय आहे. बीटरूटच्या विशेष चवीमुळे सॅलड्साठी त्याला सगळ्यांची पसंती असते. बीट चवदार असण्यासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. हा बीटरूट चा पराठा सगळ्या वयोगटांसाठी खाण्यास एकदम उत्तम आणि पौष्टीक सुद्धा. झटपट २० मिनिटात तयारही होतो.आता दोन व्यक्तींसाठी पराठा बनवायला काय काय साहित्य लागेल ते बघूया.

Related Post

बनविण्यासाठी लागणारे साहित्य- बीटरूट चा पराठा

  1. बीट( beetroot) -२ (मिक्सर मधून बारीक वाटून घेतलेले )
  2. हिंग (asafetida) -चिमुटभर
  3. गव्हाचे पीठ (wheat flour)- -२ वाटी (गव्हाचे  पीठ जर वापरायचे नसेल तर बाजरी किवा नाचणीचे  पीठ देखील वापरू शकता)
  4. आले लसून वाटलेले ( ginger garlic paste ) १/२ छोटा चमचा
  5. लाल तिखट (red chili powder) -१ चमचा
  6. हळद (turmeric powder) १/२ छोटा चमचा
  7. मीठ (salt)- चवीप्रमाणे
  8. तेल (cooking oil) -३ चमचे

बनविण्याची विधी- बीटरूट चा पराठा

  • सर्वप्रथम मिक्सर मधून बारीक वाटून घेतलेले बीट, गव्हाचे पीठ, वाटलेले आले लसून, लाल तिखट, हळद,  हिंग व मीठ हे सर्व साहित्य वर दिलेल्या प्रमाणात घेऊन एकत्र करा.
  • आता या मिश्रणाचा थोडे थोडे पाणी घालून घट्ट गोळा बांधून घ्या.
  • पोळपाटावर पोळीप्रमाणे लाटून तव्यावर थोडे तेल सोडून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या
  • गरमागरम पराठे तयार आहेत.
  • दह्याबरोबर किवा टमाटर च्या चटणीबरोबर सर्व करा ज्यामुळे हे पराठे  खायला अधिक लज्जतदार वाटतील.

बीटचे सेवन केल्याने शरीरातील हिमोग्लोबिन योग्य राहते आणि त्वचा चमकदार आणि सुंदर राहते. बीटमध्ये कॅलरीज कमी असतात आणि जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारख्या पोषक तत्व भरपूर असतात. बीट हे बी-कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे, पोटॅशियम, तांबे आणि मॅग्नेशियम यांचा उत्कृष्ट स्रोत आहे. पोषक तत्वांनी समृद्ध बीट उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी खूप फायदेशीर ठरते.  बीटरूटमध्ये भरपूर फायबर आढळते, ज्याचे सेवन केल्याने पचनक्रिया बरोबर राहते आणि बद्धकोष्ठतासारख्या अनेक गंभीर समस्या कमी होतात.बीटचे नियमित सेवन केल्याने मधुमेह आणि हृदयाशी संबंधित जुनाट आजारांचा धोका देखील कमी होतो. 

आरोग्य आणि पोषण सूचना: या वेबसाइटवरील आरोग्य आणि पोषण माहिती सामान्य माहिती देण्यासाठी आहे. प्रत्येकाची पोषण गरज वेगवेगळी असू शकते. वैयक्तिक आहार सल्ल्यासाठी आपल्या आरोग्यतज्ञाचा सल्ला घ्या. आम्ही दिलेल्या माहितीची अचूकता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करतो, परंतु ही माहिती वैद्यकीय सल्ला नाही.

प्राची राजूरकर

प्राची पर्यावरण शास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवीधर असून त्यात संशोधन देखिल करीत आहे. याचबरोबर ती शिक्षणशास्त्रात पदवीधर असून कायद्याची देखील पदवीधर आहे. थोडक्यात सांगायचेच तर ती एक संशोधक, शिक्षण व कायदेतज्ञ आहे, आणि मुख्यत्वे ती वनीकरण क्षेत्रात निपुण असून एका जवाबदार पदावर कार्य करीत आहे. तिला विविध सरकारी योजनाबद्दलचे माहिती तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचवायला आवडते जे सामान्य लोकांच्या कल्याणासाठी तसेच मोठ्या सामाजिक परीवर्तनासाठी फायदेशीर ठरेल.

Recent Posts

शेती उत्पन्न आणि आयकर: ITR फाईल करताना शेतकऱ्यांनी काय लक्षात ठेवावं?

"Income Tax", "ITR", "ITR Filing", "ITR Filing Deadline" - जुलै महिना आला की हे शब्द गुगल वर सर्वाधिक शोधले जातात.… Read More

ग्रामीण भारतात रोजगाराच्या नव्या शक्यता: TCS Layoff च्या पार्श्वभूमीवर एक विचारमंथन

भारतातील अग्रगण्य IT सेवा कंपनी TCS (Tata Consultancy Services) ने अलीकडे 12,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची घोषणा केली. ही घटना… Read More

व्हे प्रोटीन म्हणजे काय?

आज आरोग्य आणि पोषण या विषयांमध्ये लोकांचा रस झपाट्याने वाढत आहे. या प्रवाहात “व्हे प्रोटीन”/ (Whey Protein)  हा शब्द अनेकदा… Read More