आषाढ श्रावण आला कि सुरु होतात उपवास. आणि उपवासात साबुदाणा वापरून केलेले पदार्थ न खाणारा व्यक्ती शोधून सापडणार नाही, स्वयंपाकघरातील पदार्थांमधला पांढराशुभ्र साबुदाणा अनेकांना आवडतो. साबुदाण्यापासून वेगवेगळे पदार्थ केले जातात. चला तर मग बनवूया साबुदाणा वडा.
उपवासाच्या पदार्थांत विशेषकरून साबुदाण्याचा वापर केला जातो. हा साबुदाणा आरोग्याच्या दृष्टीनेही ते तितकाच फायदेशीर आहे. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या घरात विविध प्रकारचे पदार्थ तयार करू शकता. विशेषतः त्याची खिचडी आणि खीर तयार केली जाते. अनेकांना उपवासाच्या वेळी याचे सेवन करायला आवडते. तर असाच एक उपवासाचा पदार्थ आपण आज बनवणार आहोत तो म्हणजे साबुदाणाचे वडे.
आता हे वडे जर दोन व्यक्तींसाठी तयार करावयाचे झालेत तर काय काय साहित्य लागेल ते बघूया!
बनविण्यासाठी लागणारे साहित्य- साबुदाणा वडा
- १ वाटी भिजवलेला साबुदाणा (SAGO PEARLS) ( साबुदाणा रात्रीच पाण्यात टाकून आणि त्यातील पाणी निथळून भिजत घालावा)
- ८-१० हिरवी मिरची( GREEN CHILLY )
- २- उकळलेले बटाटे ( BOILED POTATO)
- १ वाटी शेंगदाणा कुट( PEANUTS)
- १ लिंबू ( LEMON )
- १ चमचा मीठ (SALT)
- तेल तळण्यासाठी (OIL)
बनविण्याची विधी – साबुदाणा वडा
- सर्वप्रथम भिजलेला साबुदाणा एका पसरट भांड्यात काढावा.
- आता त्यात २ उकळलेले बटाटे हाताने कुस्करून घालावे.
- त्यात ८-१० वाटलेल्या हिरव्या मिरच्या घालाव्या (आपण इथे लाल तिखट वापरात नसल्याने हिरवी मिरची चे प्रमाण जास्त घेतले आहे आपापल्या चवीप्रमाणे मिरचीचे प्रमाण कमी जास्त करू शकता)
- आता याच मिश्रणात १ वाटी शेंगदाणा कुट,१ चमचा मीठ व १ लीम्बुचा रस घालावा.
- सर्व मिश्रण नीट एकजीव करावे.
- आता हातावर छोटासा गोळा घेऊन त्याला वड्याचा आकार द्यावा.
- वड्याला मधोमध चमच्याने छिद्र करावे.
- शेगडी वर कढई चढवून कढईत तेल गरम करावे.
- आता गरम तेलात सर्व वडे दोन्ही बाजूनी नीट टाळून घ्यावे.
गरमागरम साबुदाणा वडे तयार आहेत. दह्याबरोबर खायला अगदी चवदार लागतील.
साबुदाणा खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. हे वजन वाढवण्यासाठी आणि मेंदूच्या विकासासाठी खूप चांगले मानले जाते. साबुदाण्याचे जर तुम्ही रोज सेवन केले तर तुम्ही अनेक समस्यांवर मात करू शकता. रोज साबुदाणा खाल्ल्याने हाडे मजबूत होण्याबरोबरच रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो. साबुदाणा खाल्ल्याने शरीराचे वजन वाढते. यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरीज चांगल्या प्रमाणात असतात, जे वजन वाढवण्यास मदत करतात. जर तुमचे शरीर खूप दुबळे असेल तर तुमच्या आहारात साबुदाणा जरूर घ्या. यामुळे तुमचे शरीर फिट राहील.
साबुदाणा खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. त्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण चांगले असते जे हाडांची वाढ आणि मजबूती वाढवते. याशिवाय साबुदाणा हा देखील लोहाचा चांगला स्रोत आहे. हे ऑस्टिओपोरोसिससारख्या हाडांची वाढ देखील कमी करू शकते. साबुदाणा खाल्ल्याने शारीरिक विकास तर होतोच, पण त्यामुळे मेंदूही सुधारतो. यामध्ये असलेले फोलेट मेंदूची दुरुस्ती करू शकते. यासोबतच मेंदूचे विकार दूर करण्यातही हे गुणकारी आहे.
आरोग्य आणि पोषण सूचना:या वेबसाइटवरील आरोग्य आणि पोषण माहिती सामान्य माहिती देण्यासाठी आहे. प्रत्येकाची पोषण गरज वेगवेगळी असू शकते. वैयक्तिक आहार सल्ल्यासाठी आपल्या आरोग्यतज्ञाचा सल्ला घ्या. आम्ही दिलेल्या माहितीची अचूकता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करतो, परंतु ही माहिती वैद्यकीय सल्ला नाही.